Sep 11

सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सतरावा

श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित "श्री सप्तशती गुरूचरित्र"


जे चर्वित चर्वणसे । विषय भोगिताति पिसे । तारावया तया असें । करीतसे गुरु कर्म ॥१॥
विप्र मुख्याचा सुत एक । कोल्हापुरी होता मूर्ख । पशु म्हणती सर्व लोक । निंदिती दुःख वाटे त्यातें ॥२॥
विरक्ता परी तो येवून । भुवनेश्वरीसी प्रार्थून । न होता ती सुप्रसन्न । जिव्हा छेदून देतसे ॥३॥
शिरस्सुमन द्याया चिंती । देवी धाडी त्या गुरुप्रति । गुरु जिव्हा देती करिती । सुमती जाती गुरुपुढें ॥४॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते छिन्नजिव्हादानं नाम सप्तदशोऽध्यायः

 

श्री गुरुदेव दत्त...!!!

Date: 11 Sep 2012

Start Jap Online